Thursday, January 19, 2006

टवाळा आवडे विनोद !

संदर्भातून वाक्ये बाहेर काढणे, शब्द बदलणे, वाचन करताना मथितार्थ नजरेआड करून भलताच अर्थ लावणे यासारख्या वाचन-दुर्गुणांमुळे कित्येकदा अर्थाचा अनर्थ होतो. अनेकदा एखाद्या प्रसिद्ध ग्रंथातून अवतरणे देऊन स्वत:चा व्यासंग दाखविण्याच्या निष्फळ प्रयत्नात लोक भलतेच संदर्भ भलत्या ठिकाणी वापरतात. याचंच एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे 'टवाळा आवडे विनोद'.

दासबोधातील एका ओवीचा हा चतकोर तुकडा (नीट न) वाचून अनेकांचा असा ग्रह होतो की रामदास स्वामींना विनोदाचे वावडे होते ! या वरून काहींनी समर्थांवर टीका केली आहे, तर काहींनी हा समज खोटा कसा आहे हे दाखवायचा प्रयत्न केला आहे.

ही ओवी दासबोधाच्या सातव्या दशकातील श्रवणनिरूपण या नवव्या समासाची ५१ वी ओवी आहे. संपूर्ण ओवी याप्रमाणे :
टवाळां आवडे विनोद । उन्मत्तास नाना छंद । तामसास अप्रमाद । गोड वाटे ॥
(अर्थ: थट्टेखोर माणसास विनोद आवडतो, अंगात माज आलेल्या माणसास नाना व्यसने आवडतात, तर तामसी माणसास दुष्कर्म करणेच गोड वाटते.)

संदर्भाच्या कुशीतून खुडलेले पोरके शब्द त्यांचा अर्थ चटकन गमावतात. म्हणून ही ओवी कोणत्या संदर्भात येते ते प्रथम पाहू. या समासात विविध प्रकारच्या लोकांना त्यांच्या रूचीप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी कशा आवडतात याचे मोठे रसाळ विवेचन करताना समर्थ सांगतात -
ज्ञानियास पाहिजे ज्ञान । भजकास पाहिजे भजन । साधकास पाहिजे साधन । इछेसारिखे ॥
परमार्थ्यास परमार्थ । स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ । कृपणास पाहिजे अर्थ । मनापासुनी ॥
... याच ओघात समर्थ वरील श्लोक सुद्धा सांगतात. तात्पर्य,
'आवडीसारखे मिळे । तेणें सुखचि उचंबळे ।' हे श्रोत्यांना समजावून सांगताना दिलेल्या अनेक उदाहरणांपैकी एक म्हणजे 'टवाळा आवडे विनोद'. इतकी साधी सोपी गोष्ट आहे ! परंतु 'संदर्भासह स्पष्टीकरण' हे केवळ परिक्षेत गुण मिळविण्यासाठी वापरायचे असते !

बरे, संदर्भ सोडून द्या. तरीसुद्धा या वाक्याचा अर्थ, 'टवाळ माणासाला विनोद आवडतो' एवढा आणि एवढाच होतो. यापुढे जाऊन, 'विनोद आवडणारा माणूस टवाळ असतो' असा या विधानाचा अर्थ अजिबात होत नाही !! उदा. 'माकडाला फुटाणॆ आवडतात' याचा अर्थ 'फुटाणॆ आवडतात तो प्रत्येक जीव माकड असतो' असा अजिबात होत नाही !! (अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी 'Logic' मधले Converse, Inverse आणि Contrapositive हे प्रकार पहावेत...)

आता निर्धास्तपणे विनोद करा ! तसेही 'काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्' असे म्हटलेलेच आहे :)

14 Comments:

Blogger Nandan उवाच ...

निखिल, अगदी खरे आहे. लेख आवडला.

1:20 AM  
Blogger शैलेश श. खांडेकर उवाच ...

हा हा हा!!! खुपच छान लेख आहे. मस्तच!

1:49 AM  
Blogger Pawan उवाच ...

मस्त लेख आहे.
आता "चोराच्या उलट्या बोंबा", विनोद करा पाहू! ;-)

6:25 AM  
Anonymous Anonymous उवाच ...

Khup diwasanpasun tuze blogs mi vachat aalo aahe...nehemi comment takin mhanto ani veesarun jato.
Tu ekdum sahi lihitos...ekdum danga. Tuzi vinodbuddhi achat aahe. ani vaicharikpaNachi daad dili pahije. Mi nehemi tuzya navin blog chi vaat pahato...vachun sagalya mitranna pathavto. keep up the good work.

btw, apan varga-mitra hoto...bhaveschool.
yakach yattet basun booka faDli apaN.. tara tara. :)

-Swapnil sapar.

8:05 PM  
Anonymous Anonymous उवाच ...

सही रे.. मस्त लेख आहे. टवाळांना पण आवडेल ..(जसा मला आवडला :)- )

9:02 PM  
Anonymous Anonymous उवाच ...

Nikhil, Namaskar...tuze saglech lekh keval apratim aahe..malach nahi tar amchya ghari, mazya mitrana pan far bhavtat.

Tuzyat asaleli hi pragalbhata sadaiv vrudhingat hovo hi deva pashi prarthana.

By the way..I am Aalok (Friend of Sanket Warudkar)....

2:09 AM  
Blogger Prakash Ghatpande उवाच ...

पामरा, असेच लेखन चालु ठेव टवाळा आवडे विनोद चे तर्कशास्त्र आवड्ले.मराठी नामशेष होत आहे अशी भीती आता नको.

5:34 AM  
Blogger 😀tulmulay उवाच ...

टवाळ या शब्दाचे भाषांतर कै. बेलसरे कृत दासबोधात थट्टेखोर माणुस असे केले आहे. टवाळा आवडे विनोद = थट्टेखोर माणसाला विनोद आवडतो .

संदर्भ:

सार्थ श्रीदासबोध
लेख़क:प्रा.के.वि.बेलसरे

श्रवणनिरुपण
दशक सातवा. समास नववा.
पान नं.४२३.

चला विनोदि लेखकला आता टवाळ लेखक आणि व्यंगचित्रकाराला टवाळ चित्रकार म्हणायला हरकत नाही.

अतुल मुळे.

11:51 AM  
Anonymous Anonymous उवाच ...

मी तुमच्या संकलनाशी सहमत नाही.
माझे बाकी भाष्य तुम्ही का कापून टकले ?
मी या गोष्टीचा निषेध नोंदवत आहे.
अतुल मुळे.

9:04 AM  
Blogger paamar उवाच ...

प्रिय श्री. अतुल,
आपल्या इतर प्रतिक्रिया प्रकाशित न करण्याचे कारण म्हणजे माझ्या लेखाशी, किंवा लेखाच्या मूळ मताशी त्या मला संबंधित वाटल्या नाहीत. समर्थांना विनोदाचे वावडे नव्हते/ वाचक ओव्यांचा अर्थ नीट लावत नाहीत हा लेखाचा मूळ मुद्दा असून ’टवाळ’ या शब्दाच्या अर्थ-छटांमध्ये जाणे अप्रस्तुत वाटल्याने मी आपल्या दोन प्रतिक्रिया प्रकाशित केल्या नाहीत.

10:18 PM  
Anonymous Anonymous उवाच ...

Why are not posting any new Articles? have you moved anywhere else?

9:36 PM  
Blogger paamar उवाच ...

Hi Ashwini,
I have written few posts on my other (rather original) blog :
paamar.blogspot.com
But I am anyway not writing on my blog very frequently :( Hpoing to write some posts by end of this month..

5:34 AM  
Blogger कोsहम् उवाच ...

farach bhari! makdache ani chanyanche udaharan tar mala farachhh awadale! nikhilaji tumhi mahan ahat!

12:32 AM  
Anonymous arun dixit उवाच ...

तुमचा ब्लॉग पूर्ण वाचला छान आहे.

11:24 PM  

Post a Comment

<< Home